शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'काँग्रेसला महाराष्ट्रातून कचऱ्यासारखं साफ करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 22:17 IST

Maharashtra Election 2019: 'दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करता, तशीच काँग्रेसचीदेखील सफाई करा'

पनवेल : दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तशीच साफसफाई महाराष्ट्रातून काँग्रेसची करा. दिवाळीपूर्वी येत्या २१ तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत भाजपाला बहुमत देऊन काँग्रेसची महाराष्ट्रातून साफसफाई करा, असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी खारघरमध्ये आज पार पडलेल्या गुजराथी समाजाच्या सभेदरम्यान केले. खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉल येथील सभागृहात पनवेल विधान सभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रुपाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात स्थिर सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. गुजरातमध्ये अनेक वर्षापासून स्थिर सरकार असल्याने आज देशभरात गुजरात मॉडेल प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आली. कच्छसारख्या दुष्काळी भागात मोदी सरकारने पाणी आणले. आज गुजरातच्या विकासाचे मॉडले देशभरात ओळखले जाते, असे रुपाला म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. मोदींमुळे भारताचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहे. यूपीए सरकारच्या काळात विकासकामे थांबली होती. नर्मदा धरणाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंडित नेहरूंनी केले. मात्र त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदींनी केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागे सर्वानी उभे राहा. त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करुन भाजपाची ताकद वाढवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील पनवेल विधानसभा क्षेत्रातील पाणी, वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. कोस्टल रोडचे काम लवकरच सुरु होईल तसेच पाण्याची समस्या देखील लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा दिला आहे. त्यामुळे सर्वांनी भाजपाला मोठ्या संख्येने विजयी करावे, असे ठाकूर म्हणाले.  यावेळी उपस्थितांमध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन जडाफिया, गुजरातचे माजी मंत्री जयंतीभाई कवाडीया, नगरसेवक रामजीभाई बेरा, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, वाकडलेवा पाटीदार समाजाचे भांजीभाई पटेल, युवा नेता वैभव नाईक, आंबाभाई पटेल, बिना गोगरी यांच्यासह सौराष्ट्र लेवा पाटीदार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019panvel-acपनवेलPrashant Thakurप्रशांत ठाकूरBJPभाजपा