शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:11 IST

आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे.

रसिक वाचकहो, आपल्या राज्यातील निवडणूक काल संपली. आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे. आबालवृद्धांत सुरू आहेत झालेल्या मतदानाबाबतचे अंदाज, पैजा व गॉसिप, गप्पा... आज त्याविषयी....

 

ये गं ये गं सरी, माझी झोळी भरीये गं, ये गं सरी, भिजले ‘घड्याळ’ जरीसर आली धावून, गेली मला भिजवून‘त्यांच्या’ तोंडचे पाणी लावले पळवूनसांगून हे ‘जाणता राजा’ घेई उसंत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...१

पावसा असा अवेळी आलास का‘त्यांना’च भिजवूनि तू असा गेलास काकोरडे आम्हा ठेवुनि बरसलास का रे तरी ‘गुलाला’ने आम्ही भिजणार सारेमी पुन्हा येईन, सांगुनि ‘देवेंद्र’ निवांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...२

संपली निवडणूक, संपला प्रचारआता करूयात निकालाचा विचारकुठे एकतर्फी, कुठे झाली ‘घासून’‘तज्ज्ञां’चे अंदाज सुरू पैजा लावूनउमेदवारांना मात्र निकालाची भ्रांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...३ कुठल्या गावात, कोणाची आघाडीकुठल्या भागात, कोणाची पिछाडीकोणाचा कुणाशी ‘छुपा समझोता’थोडंसंच वास्तव, बºयाचशा बातापारावरचे गप्पिष्ट रेटती खोटे धादांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...४

कुणाचे ‘हिशेब’ यंदा कुणी चुकवलेकोणी कोणाला ‘कात्रज’ दाखवलेखरे काम कुणाचे, कुणाचा आभासकोण लांबचा, कोणाचा कोण खासरंगवले जात आहेत उलटसुलट वृत्तांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...५

झाला एवढा खर्च, हिशेबही लागेना कुणाच्या खिशात किती गेले कळेनानिवडणुकीत एजंटांनीच केली कमाई‘भाडोत्रीं’शी नेत्यांनी केली दिलजमाईरिकामे हात चोळत बसलेत निष्ठावंत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...६

कोण, कुठे ‘चालणार’-‘धावणार’कोणाचे पत्ते कसे कापले जाणार?कोण विक्रमांचे इतिहास घडवणार कोण यंदा ‘इतिहासजमा’ होणारकुणा वाटे हायसे, कुणी चिंताक्रांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...७

सगळा जणू संगीत खुर्चीचाच खेळखुर्च्या नि भिडूंचा नाही जमत मेळजनमत तालावर ‘ते’ घालती चक्करथांबला ताल, की खुर्चीसाठी टक्करखेळ हा सत्तेचा चालतो अविश्रांत

‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...८ 

  - अभय नरहर जोशी 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक