शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 11:14 IST

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरी अद्याप महायुतीमधील सत्तापदांच्या वाटपाचा संघर्ष संपलेला नाही. त्यातच आता शिवसेनेनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचा आरोप करत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, असा इशाराच शिवसेनेनं भाजपाला दिला आहे. यावरुन आता काँग्रेसनं भाजपा आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महायुतीला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार आता राहिला आहे का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.  'शिवसेना हा भाजपाचा सहयोगी पक्ष व महायुतीचा सदस्य असतानाही जर त्यांना भाजपा आपले आमदार फोडेल ही भीती वाटत असेल तर भाजपा किती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहे आणि महाराष्ट्राला भाजपा पासून का वाचवले पाहिजे हे लक्षात येईल,' असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. शिवसेनेनं फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता वर्तवल्यावर सावंत यांनी हे ट्विट केलं. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे.  निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरीही शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष अद्याप कायम आहे. आज दिवसभरात होऊ घातलेल्या घडामोडी पाहता सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस