शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Maharashtra Election 2019: पुणेकर होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतले कोथरुडमध्ये भाड्याचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 16:40 IST

कोथरुड विधानसभा 2019: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडविधानसभेतून अर्ज भरल्यानंतर मतदार संघातील नागरिकांनी आम्हाला बाहेरचा उमेदवार नको असल्याचे सांगत स्थानिक उमेदवार हवा असं सांगत चंद्रकांत पाटील यांना विरोध केला होता. 

पुण्यातील कोथरुड मतदार संघातील स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मी कुणी परका नसून पुण्याचाच असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र स्थानिकांना विरोध कायम बघता चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणेकर होण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदार संघातच भाड्याने घर घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहिल्याने कोथरुडमधील कुंबरे टाऊनशिप जवळ असलेल्या आर. के. प्रेस्टीजमध्ये मित्राने तात्पुरते राहण्यास घर दिले आहे. तसेच भविष्यात स्वत:चं कोथरुडमध्ये नक्की घर घेऊ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ; काॅंग्रेस - राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठींबा

चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे.कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkothrud-acकोथरुडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019