शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 12:04 IST

भाजपाकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू; काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना भाजपाकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपाकडूनकाँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना संपर्क करण्यात आला. भाजपानं फोडाफोडीचं राजकारण बंद करावं, असं म्हणत त्यांनी सर्व आमदारांना फोन रेकॉर्ड करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली. मात्र याबद्दल बोलताना आमदार खोसकर काहीसे गोंधळले. आधी आपल्यावर कुठलाच दबाव नसल्याचं म्हणणाऱ्या खोसकरांनी नंतर आपल्याला फोन आल्याचं म्हटलं. दोन आठवडे उलटूनही सरकार स्थापन करू न शकलेल्या भाजपानं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 'भाजपाकडून काँग्रेसच्या आमदारांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीच्या आमदारांना काही जणांनी फोन केला होता. मात्र कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार फोडणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. त्यामुळे आता कोणी फुटून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास सर्व विरोधी पक्ष मिळून एकच उमेदवार देऊन त्याला राजकारणातून संपवू. जनतेशी केली जाणारी प्रतारणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाकडून होणारे फोडाफोडीचे प्रयत्न पाहता काँग्रेस आमदारांना फोन टॅप करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तुम्हाला येणारे फोन टॅप करा आणि फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना उघडं पाडा, असं आमदारांना सांगितल्याचं वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोन आल्याचा दावादेखील त्यांनी केला. मात्र याबद्दल भाष्य करताना खोसकर गोंधळले. सुरुवातीला माझ्यावर कोणताच दबाव नाही, असा दावा करणाऱ्या खोसकर यांनी त्यानंतर आपल्याला चर्चेसाठी मुंबईला चला, अशी ऑफर देणारा फोन आल्याचं सांगितलं. आपल्याला आलेला फोन संशयास्पद होता. तो कशासाठी आला असेल, याची तुम्हाला कल्पना असेलच, असं सूचक विधान त्यांनी केलं. आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी एकनिष्ठ राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपा