शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री'तील बंद खोलीत नेमकं काय झालं?; अमित शहांनी 'संस्कारां'वर बोट ठेवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:16 IST

उद्धव ठाकरेंवर अमित शहांचा पलटवार; शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर भाष्य

मुंबई: राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना त्यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा बोलत का नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर अमित शहांनी सत्ता संघर्षावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. मात्र असा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आलेला नव्हता, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं.मुख्यमंत्रिपदाबद्दलचा शब्द दिलाच नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीस शब्द फिरवत आहेत. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे, असा दावा उद्धव यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत केला होता. त्यावेळी त्यांनी अमित शहांसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. त्यावर बंद दाराआड झालेली चर्चा जाहीर करणं, उघड करणं हे आमच्या पक्षाच्या संस्कारात बसत नाही, असा टोला शहांनी लगावला. खोटं बोलणं मला पटत नाही. बाळासाहेबांचे तसे माझ्यावर संस्कार नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर शहांनी पलटवार केला. मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकांवेळी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला होता. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होतील, असं आम्ही जाहीरपणे म्हटलं होतं. मग त्यावेळी कोणीही त्याबद्दल आक्षेप का नोंदवला नाही, असा प्रश्न शहांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यावेळी काहीच न बोलणारे आता नव्या मागण्या घेऊन येत आहेत. मात्र त्या आम्हाला अमान्य आहेत, असं शहा म्हणाले आहेत. त्यामुळे युतीमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी