शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 22:08 IST

राज्याच्या राजकारणावर बोलताना गडकरींचं विधान

मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय भूपृष्ठमंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. मात्र राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले. भाजपानं राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण आणि सूचक मानलं जातं आहे.मुंबईतील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र तो तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारला आहे, असं गडकरी म्हणाले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी असलेले नेतेच यावर भाष्य करू शकतात, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. या प्रश्नावर बोलताना त्यांनी क्रिकेटचा संदर्भ देत सूचक भाष्य केलं. 'राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधी कधी तुम्हाला वाटतं, तुम्ही सामना गमावत आहात. पण सामनाचा निकाल बरोबर उलट लागतो,' असं गडकरी म्हणाले. मी आताच दिल्लीहून आलोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणार नाही. दिल्लीत सक्रीय असल्यानं मला राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, असं गडकरी म्हणाले. राज्यात भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचं सरकार आल्यास विकासकामांवर परिणाम होईल का, असा प्रश्न यावेळी उपस्थितांपैकी एकानं गडकरींना विचारला. त्यावर सरकारं बदलत असतात. पण प्रकल्प सुरूच राहतात. त्यामुळे त्यात समस्या येणार नाहीत. राज्यात कोणतंही सरकार आलं. मग ते भाजपाचं असो, काँग्रेसचं असो, राष्ट्रवादीचं असो किंवा मग शिवसेनेचं असो, ते सकारात्मक आणि विकासाच्या धोरणांना आणि मोठ्या प्रकल्पांना सहकार्य करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस