शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?, गुजरात पॅटर्नची दिग्गजांना धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 10:16 IST

मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे. वाचा कोणाच्या नावांची आहे चर्चा.

मुंबई - सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र अद्यापही झाला नाहीये. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिग्गजांचा पत्ता कापून भाजपकडून नव्यांना संधी दिली जाणार असल्याच्या वृत्ताने अनेकांना धडकी भरली आहे. मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे.

मुंबईतून आशिष शेलार, अतुल भातखळकर आणि राम कदम यांची नावे समोर आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण, वर्धेचे समीर कुणावार, अकोल्याचे रणधीर सावरकर, वाशिमचे राजेंद्र पाटणी, नंदूरबारचे डॉ.विजयकुमार गावित, अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील, जालना जिल्ह्यातील नारायण कुचे, नागपूरचे प्रवीण दटके, नाशिकच्या देवयानी फरांदे, चंद्रपूरचे बंटी भांगडिया, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, पुण्याच्या माधुरी मिसाळ अशा नावांची जोरदार चर्चा होत आहे. मंत्रिमंडळाला नवीन चेहरा देण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा आग्रह असल्याने या नावांना बळ आले आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर,  डॉ.संजय कुटे, बबनराव लोणीकर,सुभाष देशमुख, गिरीश महाजन, जयकुमार रावल, विजय देशमुख या अनुभवी नेत्यांना संधी मिळणार की नाही या बाबत अनिश्चितता आहे. मदन येरावार, परिणय फुके, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेही अनिश्चिततेच्या झुल्यावर आहेत. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना संधी देताना प्रदेशाध्यक्ष अन्य व्यक्तीकडे देण्याची अट असेल असे मानले जाते. बहुतांश चेहरे नवीन दिले तर सरकारची घडी बसवून गतिमान कारभार देणे कठीण जाईल, असे सांगत अनुभवी लोकांना संधी देत जुन्या-नव्यांचे संतुलन साधावे असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्या बाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही न होणे हे मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळा निकाल दिला तर भाजप-शिंदे यांच्याकडून विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांकडे लगेच नावे पाठवायची आणि नियुक्त्या करवून घ्यायच्या अशीही रणनीती असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र