शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

Belgaum Municipal Corporation Election Results: संजय राऊतांचा स्वप्नभंग; ३० जागा जिंकण्याचा होता निर्धार, पण दोनच जागांवर 'महाराष्ट्र एकीकरण'ला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:21 IST

Belgaum municipal corporation Results: कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत म.ए. समितीचा शुभम शेळके हा तरुण उभा राहिला होता. त्याला लाखावर मते पडली होती. यावरून संजय राऊतांनी अंदाज बांधला होता. 

बेळगाव महानगरपालिकेचा निवडणूक (belgaum municipal corporation) निकाल आज जाहीर होत असून मतमोजणीमध्ये भाजपानेमहाराष्ट्र एकीकरण समितीची धुळधाण उडविली आहे. बेळगाव (शहर) म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti) असे समीकरण आमदारकीनंतर आता महापालिकेतही यावेळी बदलताना दिसत आहे. मतमोजणी दिवशी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 30 जागा जिंकण्याचा दावा केला होता. आज त्यांचा स्वप्नभंग झाला आहे. (Sanjay raut Claimed 30 seats in Belgaum, but MA Samiti won only 2 seats yet. bjp leading on 36.)

बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव 

संजय राऊत यांनी या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत हाती आलेले निकाल पाहता मए समितीच्या पारड्यात अद्याप दोनच जागा आल्याने भाजपाच्या ताब्यात महापालिका जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. 

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत म.ए. समितीचे शुभम शेळके हा तरुण उभा राहिला होता. त्याला लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30 च्या आसपास जागा जिंकू, असा विश्वास राऊत यांना होता. तसेच आम्ही प्रचाराला गेलो तर एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद होईल म्हणून इथूनच मदत करत असल्याचे म्हटले होते. 

12.30 पर्यंतचा कल काय...यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली आहे. 

  • महाराष्ट्र एकीकरण समिती : 2
  • भाजप : 36
  • काँग्रेस : 09
  • अपक्ष : 10
  • एमआयएम : 1 
टॅग्स :belgaonबेळगावSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समितीBJPभाजपा