शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:24 IST

Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

Deputy CM Eknath Shinde News: राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंची युती, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि महायुतीवर होणारे परिणाम यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकाचवेळी दिल्लीत जात आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. 

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण

विधानसभा निवडणूक झाल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती अद्यापही थांबताना दिसत नाही. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात आले आहेत. परंतु, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरून शिंदे गटात येण्याचा ओघ कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात या घडामोडी असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक

दिल्ली दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक्सवर एक पोस्ट करून कौतुकोद्गार काढले आहेत. अभिनंदन! भारताच्या इतिहासात सलग २,२५८  दिवस सेवा देणारे अमित शाह हे देशाचे पहिले गृहमंत्री ठरले आहात. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री तर आहातच. पण सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे आपण कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते आहात. देश हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी आपणांस शुभेच्छा, असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावावर खास विक्रम नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भूषवण्याचा मान अमित शाह यांना मिळाला आहे. या बाबतीत अमित शाह यांनी माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना मागे टाकले आहे. अमित शाह हे २ हजार २५८ दिवस भारताचे गृहमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी ३० मे २०१९ रोजी पहिल्यांदाच गृहमंत्री पद स्वीकारले. त्यानंतर २०२४ मध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतरही गृहमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावरच सोपवण्यात आली.  माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत २ हजार २५६ दिवस गृहमंत्रीपद भुषवले. तर, सरदार वल्लभभाई पटेल हे १ हजार २१८ दिवस देशाचे गृहमंत्री राहिले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना