शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Maharashtra day: 'कोणालाही माझ्यासारखं जगायला लागू नये म्हणून हा अट्टाहास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 11:56 IST

लैगिक शिक्षणावर काम करणाऱ्या चांदनी गोरे यांची कहाणी 

पुणे : जन्माला येताना आपण कोणत्या घरात यायचं, हे जसं आपल्या हातात नसतं. तसं पुरुष म्हणून जन्म घ्यावा की स्त्री म्हणून, हेदेखील आपल्या हातात नसतं. पण म्हणून तृतीयपंथीयांनी कायम पिळवणूकच सहन करायची असा अर्थ होत नाही असं तत्वज्ञान आहे चांदणी गोरे यांचं. स्वतः तृतीयपंथी असणाऱ्या आणि लैंगिक शिक्षणासाठी काम करणाऱ्या चांदनी या लहान मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करतात. सुरुवातीला आपली मुलगी ही स्त्री  किंवा पुरुषापेक्षा काहीतरी वेगळी आहे हे घरचेदेखील स्वीकारत नव्हते. त्यांनी चांदनी यांनी जमेल तेवढे समजवण्याचा, वेळप्रसंगी मारून, धमकी देऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण मी वेगळी आहे आणि हे  नैसर्गिक आहे या मतापासून त्या ढळल्या नाहीत. अखेर घरच्यांनी ते मान्य केले. आज त्या निर्भया आनंदी जीवन नावाची संस्था चालवतात. त्या माध्यमातून लहान मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक ठिकाणी जाऊन, मुलांना एकत्र करून चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबद्दल त्या सांगतात. वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या समजून त्यांची मानसिक गुंतागुंत दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यावेळी अनेक लहान मुलांच्या शारीरिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या असून त्यातूनही त्या मार्ग काढत असतात. याकरता मुलांचे, पालकांचे मतपरिवर्तन करावे लागते. वेळप्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पण कोणावरही शारीरिक अत्याचार होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासोबतच तृतीयपंथीयांसाठी त्या बचतगट चालवतात. त्यांना शिक्षणाचे, बचतीचे महत्व पटावे, त्यांनी समाजात सन्मानाने वावरावे असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या सांगतात की, तृतीयपंथीयांना बाकी काही नको असते. ते आसुसलेले असतात ते प्रेमासाठी. समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे झाले नाही तर कायम समाजव्यवस्थेच्या बाहेरच राहतील असे त्यांना वाटते. आज समाज वेगाने बदलत असला, तरी जे माझ्यासारखे पुढे आले त्यांनाच स्वीकारले गेले. जे कायम मागे राहिले त्यांना काळाने मागेच ठेवले असे त्या दुर्दैवाने नमूद करतात. चांदनी या पुण्यातल्या गरीब लोकवस्तीत राहतात. जिथे हातातोंडाशी गाठ पडत नाही, तिथे लैंगिक शिक्षणाचे काय महत्त्व असणार? मात्र तरीही, माझे शरीर, माझा अधिकार हा हक्क प्रत्येकाला हवा असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आजही चांदनी दुवामध्ये नाचतात. तृतीयपंथी म्हणून करण्यात येणारे काम त्यांनी कधीच लपवले नाही. पण माणूस म्हणून त्यांचे काम अधिक स्तिमित करणारे आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास मी स्वतःला स्वीकारलं, तेव्हा जगाने मला स्वीकारलं. जे माझा वेगळेपणा बघून हसतात, त्यांच्या विचारात असणारे मागासलेपण बघून मीही त्यांना हसते. शेवटी समाजाने आम्हाला मोठ्या मनाने स्वीकारलं तर त्यात सगळ्यांचं हित आहे. तसं  झालं नाही तरी आमचं अस्तित्व नाकारून चालणार नाही, हेदेखील सत्य समाजाला स्वीकारावं लागणारच आहे. चांदनी यांचे शब्द अधिक टोचतात, कारण त्यांना सत्याची धार आहे. आकाशातल्या चांदणीप्रमाणे उपेक्षितांच्या आयुष्यात लखलखणाऱ्या चांदनी यांच्या कामाला खूप खूप सदिच्छा ! 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे