शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Update: महाराष्ट्रात कोरोना बेलगाम; 24 तासांत 63,729 नवे रुग्ण, 398 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:42 IST

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे.

मुंबई- देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सरकारी व्यवस्था पार कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. 24 तासांत समोर येणाऱ्या सक्रिय रुग्णात सातत्याने विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशातील नव्या संक्रमितांच्या आकड्याने आता दोन लाखांचा टप्पाही ओलांडला आहे. तर 1 हजार 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 14 लाख 71 हजार 877 एवढे सक्रिय कोरोनाबाधित आहेत. (Maharashtra CoronaVirus update new positive case hospital beds availability)

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 63,729 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 398 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल 59,551 जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्रात एकूण रुग्ण : 37,03,584 एकूण रिकव्हरी : 30,04,391एकूण मृत्यू : 59,551एकूण सक्रिय रुग्ण : 6,38,034

मुंबईत बेडच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने बेड वाढविण्याचे काम सुरू केले आहे. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालये उपलब्ध व्हावीत यादृष्टीने, आता सोम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लक्झरी हॉटेलचा वापरही करण्यात येत आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

जसलोक रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात -बेडची कमतरता दूर करण्यासाठी आता बीएमसीने जसलोक रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात केले आहे. येथे आता केवळ कोरोना रुग्णांवरच उचार केले जातील. जसलोकमधील नॉन कोविड रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवीले जात आहे. एढेच नाही, तर येथे आणखी 250 बेड वाढविण्यात येत आहेत.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

ऑक्सीजनची कमतरता -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून, 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 11.9 लाखांवर जाईल आणि ऑक्सीजनची मागणी 200 मेट्रिक टनवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात 1200 मेट्रिक टन ऑक्सीजनचे उत्पादन होते. मात्र, मागणी 1300 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सीजनची आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर