शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Corona Updates: मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी बोलावली टास्क फोर्सची बैठक; नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 12:36 IST

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Covid-19) वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Covid-19) वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णवाढ झपाट्यानं होत असल्यानं राज्यात पुन्हा काही कठोर निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीनं कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढविण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज दुपारी होणारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक देखील मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आहे. राज्य सरकारनं आता पूर्णपणे कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.  राज्यात काल ३९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात २५१० रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळले आहेत. तसंच ओमायक्रॉनचे देशातील सर्वात जास्त रुग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात ओमायक्रॉनमुळे होऊ शकते असं मत देखील तज्ज्ञांनी याआधीच व्यक्त केलं आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही अधिक वेगानं ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार होतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालू शकतो याचा अंदाज घेत सरकार सतर्क झालं आहे. 

मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदीमुंबईमध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर आता जमावबंदी आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांमध्ये किंवा बंदिस्त जागांमध्ये पार्टीचं अथवा कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. ३० डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधील, रेस्तराँ, हॉटेल्स, ओपन स्पेस किंवा बंदिस्त जागांमध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं किंवा पार्टींचं आयोजन करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

कोविड केंद्रे सुरू करण्याची तयारीकोविड रुग्णांची संख्या दोनशेवरुन आता दोन हजारांवर पोहोचल्याने महापालिकेने पाच जम्बो कोविड केंद्र सुरु करण्याची तयारी केली आहे. या केंद्रांची देखभाल व वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका संबंधित वैद्यकीय संस्थेला १०५ कोटी रुपये देणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी अथवा जोपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोपर्यंत या केंद्रांची जबाबदारी संबंधित खासगी वैद्यकीय संस्थेकडे असणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस