शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 20, 2021 19:52 IST

अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole)

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात पदर्शित होऊ दाणार नाही, तसेच त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा देणारे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आता सफाई दिली आहे. ते म्हणाले, आपण अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही. तर त्यांच्या कामाच्या विरोधात आहोत. मात्र, सफाई देतानाच पटोले यांनी या दोन्ही अभिनेत्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन हे खरे हिरो नाहीत. असते तर ते संकटाच्या काळात सामान्य जनतेसोभत उभे राहिले असते, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे." (Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan.)

पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे. ते खरे हिरो नाहीत. जर ते खरे हिरो असते, तर ते संकटाच्या काळात सामान्य लोकांसोबत उभे राहिले असते. जर त्यांना कागदी वाघ बनूनच राहायचे असेल तर आम्हाला काहीही अडचण नाही."

नाना पटोले यांच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस, अभिनेत्यांबद्दलच्या वक्तव्यावरून वाद

"आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील अथवा ते दिसतील, तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाही मार्गावर चालू. आम्ही 'गोडसे वाले' नाही तर 'गांधी वाले' आहोत," असेही पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते नाना पटोले? -अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले म्हणाले होते, "काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली होती. 

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना रिपाइं देणार सुरक्षा; नाना पटोलेंना रामदास आठवलेंचा इशारा

यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. राज्यात त्यांचे जिथे शूटिंग सुरू असेल तेथे ते बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू. तसेच त्यांचे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशारादेखील नाना पटोले यांनी दिला होता.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAmitabh Bachchanअमिताभ बच्चनAkshay Kumarअक्षय कुमारcongressकाँग्रेस