शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:22 IST

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही.

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता आमच्याकडे सहा महिन्यांचा वेळ आहे. सरकार कसे स्थापन करायचे, हे आमच्या तिघांमध्ये ठरल्यावर सरकार स्थापनेचा दावा पुन्हा केला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर उद्धव व आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उपरोधिक टीका करताना उद्धव म्हणाले की, बहुमताची संख्या दाखविण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचीही मुदत वाढवून न देणाऱ्या दयावान राज्यपाल महोदयांनी आता (राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून) आम्हाला सहा महिन्यांचा वेळ दिला आहे. असा मोठ्या मनाचा राज्यपाल सर्वांनाच मिळाला, तर त्या-त्या राज्यांचे व देशाचेही नक्कीच भले होईल!शिवसेनेला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी व काँग्रेसचा अधिकृत निर्णय झाला नसला तरी त्यांनी नकार दिलेला नाही, हेही सत्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे सरकार स्थापन करायचे हे काही साधे काम नाही. तिघांनी एकत्र बसून त्यासाठी सामायिक किमान कार्यक्रम ठरवावा लागेल. त्यांच्या मनात काही मुद्दे आहेत. आमच्याही मनात काही मुद्दे आहे. येत्या काही दिवसांत एकत्र बसून या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकारस्थापनेच्या आमच्या प्रयत्नांवर टीका केली जात आहे. पण भाजपाने काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत व मोदींवर तोंडसुख घेणाºया चंद्राबाबू नायडूंसोबत आंध्र प्रदेशात कसे सरकार स्थापन केले याची माहिती मी मागविली आहे. त्यातून आताच्या या प्रयत्नांत आम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल, असेही ते म्हणाले. आतातरी भाजपासोबतची तुमची युती तुटली असे म्हणायचे का, असे विचारता ठाकरे यांनी युती आम्ही नाही, त्यांनी तोडली आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचाराने आम्ही एकत्र आलो होतो. अयोध्येतील राम मंदिर हाही त्याचाच एक सामायिक मुद्दा होता. पण एकीकडे एकवचनी रामाचे गोडवे गायचे व दुसरीकडे दिलेली वचने मोडायची असे वागणाऱ्यांशी युती सुरू ठेवण्यात अर्थ तरी काय आहे?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस