शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:17 IST

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ४१ विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

Maharashtra Cabinet Meeting : मुंबई : आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.४) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मच्छिमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी ५० कोटी मंजूर करण्यात आले. तसेच, प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने ३८ निर्णय घेतले होते. यामध्ये सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेस सरकारने मंजुरी दिली होती.

राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :- राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार- दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार- टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव- पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन- प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद- राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ- राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार- लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण- कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र - जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल- कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय- महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव- बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित- उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार- बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना- वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी - रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र