शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अखेर ठरलं! राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 जूनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 17:18 IST

मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी शिवसेना, भाजपामधील अनेकजण उत्सुक

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे अनेक आमदार उत्सुक आहेत. तर आज दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज काँग्रेस, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यापैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत आणखी सहा जणांची मंत्रीपदी वर्णी लागेल. यात शिवसेनेच्या केवळ एकाच आमदाराला मंत्रीपद मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण सात जागा भरल्या जातील. त्यासाठी शिवसेना, भाजपा आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कॅबिनेट विस्तारात भाजपा आमदार आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांना स्थान मिळू शकतं. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनादेखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि बंडखोर नेते विजयसिंह मोहिते यांना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील