शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं", कॉंग्रेसचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 18:10 IST

Maharashtra Cabinet Department Allocation : मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे रखडलेले खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. 

मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे रखडलेले खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटातील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्याकडील एकेक खाते कमी करण्यात आले असून, ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. यावरून आता माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकरू यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नव्हते, अशी तक्रार करणाऱ्यांना आता पुन्हा अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, "अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं. ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय."

कृषी खाते आता धनंजय मुंडेंकडेशिवसेना शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते होते. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून, या खात्याचा कार्यभार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन ही खाती आहेत. दुसरीकडे, दादा भुसे यांच्याकडे असलेला बंदरे हा विभाग आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांना देण्यात आला आहे. नवीन खातेवाटपानंतर आता दादा भुसे यांच्याकडे  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते आहे. 

अजित पवारांकडे 'अर्थ'उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ व नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर, रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेले अन्न नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खाते आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाYashomati Thakurयशोमती ठाकूर