शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget : मागासवर्गीय, आदिवासींच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प - नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 21:27 IST

Nitin Raut : मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे आणि त्यांच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नितीन राऊत म्हणाले.

नागपूर : आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेला "मुंगेरीलाल के हसीन सपने" दाखविणारा अर्थसंकल्प असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी केली आहे. मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे आणि त्यांच्या विकासाकडे पाठ फिरविणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नितीन राऊत म्हणाले. राज्यातला शेतकरी फार अडचणीत आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे, शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतुद करण्याची गरज होती. हा अर्थसंकल्प म्हणजे गणितीय आधारावर शिंदे - फडणवीस सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब आहे. अर्थसंकल्पात सवलतींच्या घोषणाची फक्त खैरात करण्यात आली असून ग्रामीण भागाकडे ही दुर्लक्ष करण्यात आले आहे. "आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. या घोषणा वरकरणी दिसायला आकर्षक वाटत असल्या तरी '15 लाख बँक खात्यात जमा होणार किंवा अच्छे दिन येणार' या घोषणाप्रमाणेच आज केलेल्या घोषणा नव्या जुमला ठरतील," असा टोलाही त्यांनी लगावला.

नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता परंतु नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी सुरू झालेली नाही. कामगारांसाठी सरकार काय करणार आहे? बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याणासाठी असलेला निधीपैकी जवळपास 40 ते 50 टक्के निधी खर्च झालेला नाही. जिल्हा विकास योजनांचा निधी असो कि अन्य विभागांवर खर्च होणारा निधीबाबत कागदोपत्री तरतूद करायची आणि प्रत्यक्षात काहीच खर्च करायचा नाही. मात्र अमुक योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केली असे ढोल बडवायचे, अशी आजवर भाजपची कार्यशैली राहिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी आणि घोषणा यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता जवळपास नाहीच, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023