शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; अजित पवार म्हणाले- 'तुमचेही वरिष्ठ नेते आहेत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 15:36 IST

भाजप आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख आल्यानंतर विरोधकांनी माफीची मागणी केली.

मुंबई: आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवसही मोठ्या गदारोळात गेला. आधीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरू असताना, भाजप आमदार राम सातपुते यांच्या एका वक्तव्याने दुसरा वाद निर्माण झाला. यावेळी सभागृहात बोलत असताना राम सातपुते यांच्या तोंडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख निघाला. यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवारांनीही राम सातपुते यांच्या माफीची मागणी केली. अकेर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने वाद मिटला.

काय म्हणाले राम सातपुते?सभागृहात बोलत असताना राम सातपुते म्हणाले की, 'जितेंद्र आव्हाड मला दलित आमदार म्हणून हिनवत आहेत. हो मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या, त्याचा मला अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, त्याचा मला अभिमान आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण दिलं नाही,' असा उल्लेख सातपुते यांनी केला. 

यानंतर अजित पवार म्हणाले, 'प्रत्येकाला आपल्या वरिष्ठ नेत्याचा अभिमान असतो. मी अनेक वर्षांपासून सभागृहात येतो, असे प्रसंग अनेकदा येतात. एकेरी उल्लेक झाला असेल, तर नवीन पायंडे पडतील. सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचेही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर शब्दाने शब्द वाढततील. त्यामुळे राम सातपुते यांनी तात्काळ माफी मागून विषय संपवावा. मी स्वतः विरोधी पक्षनेता असतानाही अनेकदा माफी मागितली आहे. त्यामुळे कुणाचाही अपमान व्हायचे काम नाही,' असं अजित पवार म्हणाले.

यानंतर राम सातपुते यांनी दिलगीरी व्यक्त केली. 'मी पहिल्यांदाच आमदार झालोय. बोलण्याच्या ओघातून माझ्या मी बोलून गेलो. सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं राम सातपुते म्हणाले. त्यांच्या दिलगिरीनंतर या वादावर पडदा पडला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन