"मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:34 PM2022-03-24T17:34:32+5:302022-03-24T17:35:08+5:30

Uddhav Thackeray : आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घोषणा झाल्या आता आम्ही कामाला लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

maharashtra budget session : cm uddhav thackeray targets oppositions on dharavi zopadpatti punarvikas yojana | "मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

"मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Next

मुंबई : मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधाला. तसेच, मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार केला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते गुरुवारी विधानसभेत होते. 

1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

याचबरोबर, मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांच्यासाठीचा विचार प्रत्यक्षात या सरकारकडून आणले जात आहे, त्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतोय. तसेच, रेल्वेच्या जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात बोलणं सुरू आहे. धारावी पुनर्विकास करण्याचे मनात आहेत. धारावीचा विकास व्हायला पाहिजे. केंद्र सरकारसोबत आमचे बोलणे सुरू आहे, असे म्हणत धारवीचा पुनर्विकास हा केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

आमदारांना 300 घरं देणार - मुख्यमंत्री 
आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घोषणा झाल्या आता आम्ही कामाला लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

Read in English

Web Title: maharashtra budget session : cm uddhav thackeray targets oppositions on dharavi zopadpatti punarvikas yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.