शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी थकले; ट्रेझरीचे चेकही वटेनात, महासंघाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:55 IST

Maharashtra Government Contractor Dues : महाराष्ट्र राज्य कंत्राटदारांचे ७७ हजार कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. ट्रेझरीचे चेक वटत नसल्याचा आरोप मिलिंद भोसले यांनी केला असून ९ मार्च रोजी निर्णायक बैठक होणार आहे.

सोलापूर : राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशवन सुरु झाले आहे. अशातच लाडक्या बहिणींसाठी सुरु केलेली योजना राज्याच्या तिजोरीवर किती मोठा झटका देऊन गेली आहे, हे समोर येत आहे. शासकीय कंत्राटदारांची तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असून, शासनाने दिलेले चेकही ट्रेझरीमध्ये पैसे नसल्यामुळे वटत नसल्याचा खळबळजनक आरोप 'राज्य कंत्राटदार महासंघाने' केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतील आर्थिक चणचणीचा मोठा फटका आता राज्यभरातील विकासकामांना बसताना दिसत आहे. मागील वर्षापर्यंत कंत्राटदारांची एकूण थकबाकी ८९ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. कामाचे पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांनी आत्महत्या देखील केली होती. यानंतर कंत्राटदार आणि अभियंत्यांनी वारंवार केलेल्या आंदोलनांनंतर सरकारने काही रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात केवळ १० टक्के रक्कमच अदा करण्यात आली आहे. उर्वरित ७७ हजार कोटींसाठी कंत्राटदार आजही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.

चेक दिले पण पैसे कुठे?राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "काही विभागांनी कंत्राटदारांना थकबाकीचे चेक दिले आहेत, पण जेव्हा हे चेक बँकेत किंवा ट्रेझरीकडे नेले जातात, तेव्हा तिथे पैसे नसल्याचे सांगण्यात येते. हा कंत्राटदारांची थट्टा करण्याचाच प्रकार आहे."

विकासकामे ठप्प, ९ मार्चला मोठी बैठकनिधी अभावी केवळ जुनी देयकेच रखडलेली नाहीत, तर सध्या सुरू असलेली विकासकामेही जागीच थांबली आहेत. नवीन कामांना मंजुरी देण्याचे प्रमाणही नगण्य आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ९ मार्च रोजी राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मिलिंद भोसले यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Treasury Empty: Contractors' Dues Pile Up, Checks Bounce

Web Summary : Maharashtra faces financial strain as contractors await ₹77,000 crore. Checks issued are reportedly bouncing due to lack of funds. Development projects stall, sparking contractor protests and a major meeting planned to address the crisis.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Mantralayaमंत्रालयladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाMaharashtraमहाराष्ट्र