शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:21 IST

भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शा‍ब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली

मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ३ दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र विधान भवनाच्या लॉबीत आज एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात भास्कर जाधव संतापलेल्या अवस्थेत दिसतात तर तुम्ही आमचा बाप काढू नका असं सचिन कल्याणशेट्टी त्यांना उत्तर देताना दिसतात. 

भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शा‍ब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली. कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या व्हिडिओत दिसतंय की, भास्कर जाधव संतापून परवा आम्हाला इथं राज्यपालांचे भाषण मिळाले नाही असं बोलतात, त्यावर सचिन कल्याणशेट्टी बाप कशाला काढता, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का असा प्रश्न विचारतात. त्यावर जाधव आणखी संतापून हो आहे असं म्हणतात. त्यावर कल्याणशेट्टी तुम्ही सीनिअर सदस्य आहात असं विधान करतात. त्यावर जाधवांनी ठीक आहे, तुम्ही एवढ्यावर थांबा, मीदेखील थांबतो असं म्हणत वाद संपवण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी तुम्ही बाप काढायला नको होता असं विधान केले. त्यावर भास्कर जाधव पुन्हा आक्रमक झाले. जर तुम्हाला परत तेच बोलायचे असेल तर मी काढणार..मग तुम्हाला काय करायचे असेल ते करा असं जाधव म्हणतात. मग सचिन कल्याणशेट्टीही आम्हीही तुमचा बाप काढू असं बोलतात. तेव्हा जाधव यांनी काढा, तुम्हाला काढायचा असेल तर काढा. आम्ही चुकीचे काही केले नाही. तुमच्याकडून शिकायची काही गरज नाही असं बोलतात. त्यावर मी सत्ताधारी पक्षात आहे असं सचिन कल्याणशेट्टी उल्लेख करतात. तेव्हा भास्कर जाधव पुन्हा संतापतात. असू द्या सत्ताधारी पक्षाचे आणि आणखी २ मंत्री असू द्या...इथं खासगी काम कसे करता? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केल्याचे व्हिडिओत दिसून येते.

नेमकं काय आहे प्रकरण?

विधानसभेत प्रवेश केल्यानंतर सभागृहात जाताना सदस्यांना स्वाक्षरी करायला लागते. त्या सही करण्याच्या जागी आमदारांची गर्दी झाली होती. या गर्दीच्या ठिकाणी भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाला. या दोघांमधील वादाचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clash in Maharashtra Assembly: Jadhav and Kalyanshetti in Verbal Spat

Web Summary : Uddhav Sena MLA Bhaskar Jadhav and BJP MLA Sachin Kalyanshetti clashed in the Vidhan Bhavan lobby over signatures. Heated words were exchanged, escalating into a confrontation regarding respect and authority within the assembly, disrupting the session's atmosphere.
टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा