शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत केल्या दोन मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:35 IST

Maharashtra Budget 2026: हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

महाराष्ट्राचा २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष आठवण काढली. आजचा हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या.

विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे भाषण करताना माझे मन जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त मंत्रालयाची धुरा सांभाळलेले अजितदादा पवार यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडला होता. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली होती. काम करणारा माणूस  ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला दिशा देत आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांना साजेशे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो, तसेच अजित पवार यांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमातळाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. राज्याच्या वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते, अखेरीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis dedicates budget to Ajit Pawar, announces memorial, award.

Web Summary : Devendra Fadnavis dedicated Maharashtra's budget to the late Ajit Pawar, honoring his financial contributions. A memorial and an award for urban services will be established in Pawar's name, recognizing his dedication and impact on Maharashtra's economy.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार