शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“घोषणांचा डोंगर, पण जनतेच्या पदरात शून्य”, अर्थसंकल्पावर शरद पवार गटाची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 16:42 IST

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला  २०२६ चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून ‘घोषणांचा महाराष्ट्र’ घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे.

मुंबई - महाराष्ट्र सरकारने सादर केलेला  २०२६ चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून ‘घोषणांचा महाराष्ट्र’ घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प “नाव मोठे लक्षण खोटे” या म्हणीप्रमाणे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

ॲड. मातेले म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली तरी शेतकरी अजूनही वीज, पाणी, हमीभाव आणि कर्जाच्या समस्येत अडकलेला आहे. “उंटाच्या तोंडाला जीरं” अशी परिस्थिती या घोषणांची झाली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर घोषणा करून सरकार केवळ राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारने ८ लाख कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प सादर केला असला तरी राज्यावरची आर्थिक तूट वाढत चालली आहे. “घर चालवायला पैसे नाहीत आणि महाल बांधायच्या घोषणा” अशा पद्धतीने सरकारची आर्थिक धोरणे असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबई आणि महानगर विकासासाठी मेट्रो, सागरी सेतू, ग्रीनफिल्ड शहरांच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी, घर आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस उपाय दिसत नाहीत. “ढोल मोठा पण आवाज पोकळ” अशी परिस्थिती या अर्थसंकल्पाची असल्याचा आरोप त्यांनी केला.

युवा आणि रोजगाराच्या बाबतीत सरकारने स्टार्टअप, एज्यु-सिटी आणि उद्योजकतेच्या घोषणा केल्या असल्या तरी तरुणांच्या हाताला प्रत्यक्ष काम देणारी स्पष्ट आर्थिक तरतूद दिसत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षांचा नसून आगामी निवडणुकांचा अर्थसंकल्प असल्याचा आरोप करत ॲड. अमोल मातेले म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला आता घोषणांची आतषबाजी नव्हे तर विकासाचा ठोस हिशेब हवा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Empty Promises: Pawar Group Slams Maharashtra Budget as Hollow

Web Summary : Sharad Pawar's party criticizes the Maharashtra budget, calling it full of announcements but lacking substance for the public. They highlight issues with farmer support, rising debt, and unmet promises for jobs and basic needs, deeming it an election-focused budget.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार