शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या विकासाचे चौफेर चौकार चतुसूत्रीतून मांडणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:43 IST

Dhananjay Munde: हा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय

Dhananjay Munde: स्व. अजितदादांच्या विकासाच्या व्हिजनला आजचा अर्थसंकल्प समर्पित करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ सालच्या विकसित महाराष्ट्राच्या पायाभरणीचा नवीन अध्याय आज सभागृहात मांडला. महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक अशा चार स्तंभांच्या माध्यमातून राज्याच्या चौफेर विकासाची चतुसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

२५ सप्टेंबरपर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख पर्यंतचे कर्ज माफ करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा ही महायुती सरकारवर जनतेने टाकलेल्या विश्वासबद्दलची कृतज्ञता आहे. या निर्णयाबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

कृषी समृध्दी मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ५४ टीएमसी पाणी नार पार मधून मराठवाड्यात आणणे यांसह विदर्भ, खानदेश व कोकणातील नदी जोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी सरकारचे विशेष आभार मानले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासह, रस्ते, महामार्ग, सागरी मार्ग, मेट्रो असे अनेक प्रकल्प मंजूर करताना एक हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रिट रस्त्याने जोडण्याचा घेतलेला निर्णय हा आगामी काळात क्रांतिकारक ठरणार आहे. 

प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा, बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा राज्य शासन हिस्सा, तसेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, बीड जिल्हा रुग्णालय येथील मोठ्या विकासकामांना भरघोस निधी मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोग व अन्य शासकीय विभागात ७५ हजार पदनिर्मिती तसेच दीड लाख उद्योजक व ५० हजार स्टार्ट अप्स यांसह रोजगार निर्मितीचे ठरवण्यात आलेले लक्ष्य हे अर्थसंकल्पाची दूरदृष्टी आणि सामर्थ्य सिद्ध करणारे आहे. कौशल्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र जागतिक पातळीवर स्पर्धा करत असून इथली तरुणाई महाराष्ट्राची ओळख जगाच्या पाठीवर सर्वात प्रगत राज्य म्हणून करण्यासाठी पूरक व्यवस्था या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

आज स्व. अजितदादा स्वर्गातून पाहत असतील तर त्यांना नक्कीच आनंद वाटत असेल, असे मला वाटते. शासनाने दादांचे स्मारक आणि दादांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला, याचेही मी मनापासून स्वागत करतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या आठवणी जाग्या केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Budget: All-encompassing development plan based on four pillars, says Munde.

Web Summary : Dhananjay Munde hails the budget as a blueprint for Maharashtra's comprehensive development, focusing on agriculture, infrastructure, and employment. Key initiatives include farmer loan waivers, irrigation projects, rural road development, and job creation, aligning with the vision of a developed Maharashtra by 2047 and honoring Ajit Pawar's legacy.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Dhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस