शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Maharashtra Budget 2022 Updates: उद्योगांसाठी विशेष सवलत देणार, इनोव्हेशन हब उभारणार; अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:12 IST

Maharashtra Budget 2022 Updates: होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था. नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार.

मुंबई - उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. यापूर्वी गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. याच दरम्यान उद्योगांसाठी विशेष सवलत देणार आणि इनोव्हेशन हब उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 

होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था. नॅनो, जैव तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारणार. उद्योगांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. तसेच संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरू करण्यात येणार असून प्रत्येक विभागात स्थापना होणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच नालेसफाईसाठी स्वयंचलित यंत्रणा स्थापणार. राज्यातील तृतीयपंथींना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशनकार्ड देणार आहे. 

शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ३५४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद करण्यात आली. अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा देणार. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच थोर पुरुष यांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी देणार. थोर समाजसुधारकांच्या नावाने अध्यापन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार ऐवजी आता ७५ हजार रुपयांचं अनुदान. कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संसोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. य़ाशिवाय संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटींची घोषणा केली आहे.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Maharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारtechnologyतंत्रज्ञान