शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2022: राज्यात CNG, PNG स्वस्त होणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:48 IST

अजित पवारांच्या या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई – राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. २४ हजार ३५३ कोटींच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या इंधनावरील करात कपात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली होती. परंतु अर्थसंकल्पात त्यावर कुठलीही घोषणा करण्यात आली नाही.

मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी(Ajit Pawar) नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढावा. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याचसोबत मुद्रांक शुल्कावरील दंडाच्या रक्कमेत माफ करण्याची अभय योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे १५०० कोटींची घट होण्याची शक्यता आहे. राज्यात जलवाहतूकीला चालना देण्यासाठी फेरी बोट, रो-रो महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करात ३ वर्षासाठी सूट देण्यात येईल. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी व गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्काशी दस्ताशी समायोजनेसाठी लागणाऱ्या कालावधीत १ वर्षाहून ३ वर्षापर्यंत वाढ करण्यात आली आहे.(Maharashtra Budget Live Session)

सोने स्वस्त होणार

 सोने चांदीचे दागिने बनवणारे छोटे मोठे उद्योग, रिफायनरी व निर्यातीस चालना देण्यासाठी महाराष्ट्रात आयात होणाऱ्या सोने चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार आकारण्यात येणाऱ्या ०.१ टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे राज्याला १०० कोटींच्या महसुलीची तूट येण्याची शक्यता आहे.(Maharashtra Budget 2022 Speech)

पर्यटन विभागासाठी काय?

कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात येईल. पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय “महावारसा सोसायटीची स्थापना केली जाईल. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात "आफ्रिकन सफारी" सुरु करणार आहे. पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार असल्याचंही अर्थसंकल्पात सांगण्यात आले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२