शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा मराठीबाणा! मराठी भाषा भवनासाठी १०० कोटी, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:32 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. पण त्यासोबतच मराठी भाषा संवर्धनासाठीही ठाकरे सरकारनं काही महत्वाच्या घोषणा यावेळी केल्या आहेत. 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबईत १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन उभारलं जाणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून येत्या २ एप्रिल रोजी सरकारच्यावतीनं त्यासाठीचं भूमिपूजन देखील केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तसंच राज्यातील सर्व दुकानांवरील फलक देवनागरी लिपीतच असतील असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठीचे १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहेत. केंद्र सरकार याचा विचार करुन सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आशा असल्याचं अजित पवार म्हणाले. 

नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. तसंच प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारून वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. 

मराठी भाषेसाठी कोणत्या घोषणा?- मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, त्यासाठी १०० कोटींचा निधी- येत्या २ एप्रिलला मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम- प्रत्येक जिल्ह्या पुस्तकांचं गावं उभारणार - वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी यासाठी प्रयत्न केले जाणार- नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारणार- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, यासाठीची १ लाखाहून अधिक पोस्टकार्ड केंद्राला पाठविण्यात आलीत. 

 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathiमराठी