शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

महाराष्ट्र बजेट 2020: ​​​​​​​ राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:33 PM

Maharashtra Budget 2020: 'गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असतानाही या अर्थसंकल्पात विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.'

ठळक मुद्देअर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला'कृषी विभाग, महिलावर्ग, रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद''समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प'

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा तसेच राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे. कृषी विभाग, महिलावर्ग, रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पाचे स्वागत करून बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना न्याय देणारा तसेच विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देणारा आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून आजपर्यंत जवळपास १३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. 

दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही ओटीस योजना आणण्यात येणार असून नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांनाही पन्नास हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील जलसंपदा विभागासाठी १० हजार ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच दरवर्षी एक लाख कृषीपंप जोडणी देण्याची योजना असून पाच वर्षात पाच लाख सौरपंप जोडणी दिली जाईल. तसेच कृषीपंपासाठी दिवसा वीज देण्याचा सरकारचा मानस आहे, याचा शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.

गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असतानाही या अर्थसंकल्पात विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मीतीवरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी औद्योगीक वापरावरील वीज शुल्कात कपात करण्यात येणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कायदा केला जाणार आहे.या अर्थसंकल्पात जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून राज्यात ७५ नवी डायलिसीस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत.  राज्यभरात दररोज १ लाख शिवभोजन थाळी देण्यात येणार असून मुंबईत मराठी भाषा भवनही उभारले जाणार आहे.

महिला सक्षमिकरणाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष पोलीस स्टेशन निर्माण केले जाईल ज्यात अधिकारी व कर्मचारी सर्वच महिला असतील. तसेच महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागीय पातळीवर असेल याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात योग्य त्या तरतूदी केल्या आल्या आहेत. राज्याचा विकासाचा रूतलेला गाडा पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी या अर्थसंकल्पातून चालना मिळेल असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

आणखी बातम्या...

महाराष्ट्र बजेट 2020: जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

महाराष्ट्र बजेट 2020: विकासाला चालना देणारा न्यायोचित अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

महाराष्ट्र बजेट 2020: बळीराजाचं आयुष्य 'उजळणार'; कर्जमुक्तीसोबतच पाच ठळक घोषणा

महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

पूर्वीच्या कर्जमाफीची प्रक्रिया दीडवर्ष चालली; आम्ही दोनच महिन्यांत संपवणार : अजित पवार

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटAjit Pawarअजित पवार