महाराष्ट्र बजेट 2020: जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:25 PM2020-03-06T16:25:12+5:302020-03-06T16:26:59+5:30

Maharashtra Budget 2020: 'वरळी येथील दुध डेअरीच्या मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राच्या नावाखाली लाटण्याचा डाव या महाविकास आघाडी सरकारचा आहे.'

Maharashtra Budget 2020: this budget misleading of the public - Pravin Darekar | महाराष्ट्र बजेट 2020: जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

महाराष्ट्र बजेट 2020: जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर

Next
ठळक मुद्देअर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला'अर्थसंकल्प राज्यातील जनेतची दिभाभूल करणारा व फसवा''शेतकरी, आदिवासी, मच्छिमारांच्या तोंडाला पाने फुसली'

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. यावर महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प राज्यातील जनेतची दिभाभूल करणारा व फसवा आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच, या अर्थसंकल्पातून सरकारने राज्यातील शेतकरी, आदिवासी, मच्छिमारांच्या तोंडाला पाने फुसली आहेत. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील भौगोलिक साधलेला नाही, तर केवळ एक-दोन जिल्ह्यासाठी तयार केलेला अर्थसंकल्प असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयाची कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार व कर्जमुक्तीचे वचन देणारे नेते आता सत्तेत आले, पण त्यांनी आता या अर्थसंकल्पात शेतक-यांची सपशेल निराशा केल्याची टीका करताना दरेकर म्हणाले की, ज्या कोकणाने शिवसेनेला जास्त आमदार दिले, ज्या कोकणच्या जनेतने त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी मात्र कोकणाच्या विकासासाठी सुमारे ३ ते ४ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असताना कोकणासाठी तुटपुंजी तरतूद करण्याचे पाप या सरकारने केले. कोकणातील मच्छिमारांनीही महाविकास आघाडी सरकारने अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. 

वरळी येथील दुध डेअरीच्या मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राच्या नावाखाली लाटण्याचा डाव या महाविकास आघाडी सरकारचा आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याएवजी हा भूखंड हडपण्याचा प्रकार सरकार करीत आहे, असा आरोप करताना दरेकर म्हणाले की, अर्थसंकल्पात आदीवासींसाठी कुठलीही नवीन योजना व भरीव तरतुद केलेली नाही. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणा-या या सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कुठलीही ना नवीन योजना आणली ना शिक्षणासाठी भरीव तरतूद केली अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली.

आणखी बातम्या...

'7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

महाराष्ट्र बजेट 2020: बळीराजाचं आयुष्य 'उजळणार'; कर्जमुक्तीसोबतच पाच ठळक घोषणा

महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

पूर्वीच्या कर्जमाफीची प्रक्रिया दीडवर्ष चालली; आम्ही दोनच महिन्यांत संपवणार : अजित पवार

Web Title: Maharashtra Budget 2020: this budget misleading of the public - Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.