शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाराष्ट्र बजेट 2019 : ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प!: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:15 IST

आज सादर झालेला अर्थसंकल्प हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई -  यंदा वाढलेली प्रचंड महसुली तूट आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याने हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.हा सलग तिसरा तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी सुमारे १५  हजार कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ही तूट यंदा २० हजार २९२ कोटींवर गेली आहे. हे सरकारच्या ‘अर्थ’शून्य व नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे. या अर्थसंकल्पात  शेतकरी, कामगार,  व्यापारी,उद्योजक, महिला, बेरोजगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्यंक अशा कोणत्याही घटकाला दिलासा मिळालेला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि राज्यावरील कर्जाचे प्रतिवर्षी वाढणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर अधिकाधिक चिंताजनक बनत चाललेले आहे. कर्जाचा डोंगर कमी करण्याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना सरकारकडे नाही. तरीही सरकारने पुढील विधानसभा निवडणुकीत मते मिळावीत म्हणून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. परंतु, त्यासाठी पैसा कसा उभा करणार, याची स्पष्टता यात दिसून आली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’असल्याचे ते म्हणाले.भयावह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर होईल, असे अपेक्षित होते. मात्र सरकारने बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. सरसकट कर्जमाफी तर दूरच पण सरकारने राबवलेली शेतकरी कर्जमाफी योजनाही फसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र आजवर १ कोटी ३६ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ५० लाख शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लक्ष वेधले.दुष्काळाच्या मदतीबाबत सरकारने केलेले दावे वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही थेट भरीव आर्थिक मदत मिळालेली नसून,सरकार प्रामाणिक असेल तर त्यांनी दुष्काळी मदतीच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टंचाई निवारणाचे जिल्हानिहाय आराखडे तयार झाले. मात्र मे महिन्याच्या अखेरीससुद्धा बहुतांश जिल्ह्यात टंचाई निवारण आराखड्यांची समाधानकारक अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे या भीषण दुष्काळात जनतेला भरीव दिलासा देण्याचा सरकारचे दावे धादांत खोटे असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.मागील ४ वर्षात १४० सिंचन योजना पूर्ण केल्याचे सरकारने म्हटले. असे असेल तर मग आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची आकडेवारी दडवून का ठेवण्यात आली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजप-शिवसेना विरोधात असताना त्यांनी कायम सुप्रमाच्या विरोधात भूमिका घेतली. तत्कालीन सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता तीच भाजप-शिवसेना २६० प्रकल्पांना सुप्रमा देत असेल तर त्यातही भ्रष्टाचार झाला आहे का? अशीही विचारणा त्यांनी केली. जलयुक्त शिवारमध्ये राज्यातील १८ हजार गावांमध्ये तब्बल ९ हजार कोटी रूपयांचा खर्च करून २६.९० टीएमसी जलसाठ्याची क्षमता उपलब्ध झाल्याचा दावा सरकार करते. असे असेल तर यंदाच्या दुष्काळात त्याच गावांमध्ये पाण्याची टंचाई कशी निर्माण झाली? राज्यात आज साडेसहा हजार टॅंकर का सुरू आहेत? असे अनेक प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले.मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने आरक्षण न देता केवळ आर्थिक तरतुदीचे गाजर दाखवून धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. मराठा क्रांति मोर्चाचेवेळी राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक शैक्षणिक सवलती व सुविधांची घोषणा केली होती. परंतु, अद्यापही त्यांची पूर्तता झालेली नसून, आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही विविध सुविधा देण्याच्या पोकळ घोषणा सुरू केल्या आहेत, असा आरोप करून जे पाच वर्षात करता आले नाही ते तीन वर्षात कसे करणार असे अशोक चव्हाण म्हणाले. गेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याची घोषणा केली होती. २४ हजार शिक्षक भरती करण्याचे जाहीर केले होते. पण त्याचे पुढे काय झाले? याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात काहीही स्पष्टता नसल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtra Budget 2019महाराष्ट्र बजेट 2019