शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बजेट 2019: निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा वर्षाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 05:10 IST

वंचित घटकांसाठी कोट्यवधी; संजय गांधी निराधार व ‘श्रावण बाळ’चे अनुदान वाढले

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग हाती घेत, राज्य सरकारने मंगळवारी सादर केलेल्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर, अल्पसंख्यांक आदी समाजघटकांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडला.समाजातील शेवटच्या माणसांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील मानधन दरमहा ६०० वरून एक हजार रुपये करण्यात येणार आहे. धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपये, इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ७०० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक महिला व युवकांच्या रोजगारनिर्मितीसाठीह १०० कोटी रुपयांची तरतूद असून, मालेगाव (जि.नाशिक) येथे नवे सरकारी आयटीआय सुरू करण्यात येणार आहे. त्यात १० अभ्यासक्रम असतील व प्रवेश क्षमता ४६० असेल.धनगर समाजासाठी १ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली असून, आदिवासींसाठीच्या तरतुदींना अजिबात धक्का लावला जाणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. ओबीसींचे कल्याण समोर ठेवून, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळास २०० कोटी रुपये देण्यात आले.या प्रवर्गातील मुलामुलींसाठी प्रत्येकी १८ वसतिगृहे उभारण्यासाठी २०० कोटी रुपये ठेवले आहेत. पाचवी ते दहावीतील ओबीसी मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरमहा ६० रुपये तर इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना दरमहा १०० रुपये शिष्यवत्ती दिली जाणार असून त्याचा फायदा २ लाख २० हजार विद्यार्थीनींना मिळेल.आदिवासी स्तनदा व गरोदर मातांसाठी आठवड्यातून सहावेळा चौरस आहारासाठी १४० कोटी रुपये, नामांकित शाळांमध्ये आदिवासी मुलांच्या प्रवेशासाठी ३५० कोटी, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत निवास, भोजन व इतर शैक्षणिक साहित्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सामाजिक न्याय, विजाभज, महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागांतर्गतच्या अनुदानित शिक्षण संस्थांमधील परिपोषण आहारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत ९०० रुपयांवरून १५०० रु.इतकी वाढ. एचआयव्हीबाधित निवासी विद्याथ्यांचे अनुदान ९९० रुपयांवरुन १६५० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाची आकडेवारी20,293 कोटींची तूट 12,697 कोटी सिंचन16,000 कोटी बांधकाम विभागगोपीनाथ मुंडे योजनेची व्याप्ती वाढविलीशेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीइयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्य व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या ओबीसी विद्यार्थी, विद्यार्थिनींना अनुक्रमे एक लाख व ५१ हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी 150 कोटी.वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50 कोटी.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी 100कोटी.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019