शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2026 09:01 IST

प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्रभाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आज प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतरच्या काळात निवडणूक आचारसंहिता आणि एका पाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकारी नेमणुका या निवडणुकीनंतर कराव्यात असा निर्णय भाजपाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी घेतला होता. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृह मंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींसोबत चर्चा केली असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपाच्या घटनेप्रमाणे आणि महाराष्ट्रातील परिस्थिती याचा विचार करता कुणाला पदाधिकारी करावे आणि कुणाला नाही यापेक्षाही भाजपाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रत्येक जण अतिशय सक्षम आहे. प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते. मग अशावेळी ज्यांना कुणाला संधी मिळते त्यांचे सर्वजण अभिनंदन करतात. ज्यांची आज पदाधिकारी म्हणून नेमणूक होणार आहेत, त्याव्यतिरिक्त असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ज्यांना संधी प्रदेश कार्यकारिणीत देता आली नाही. परंतु भाजपा आणि वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येईल याचा सर्वांगीण विचार माझ्यासह सर्व पदाधिकारी नक्की करू अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

वाचा प्रदेश कार्यकारिणीत 'या' नेत्यांना मिळाली संधी

उपाध्यक्ष 

अतुल काळसेकरभारती पवारसंजय कौडगेसंजय भेंडेरामदास तडसकेशव उपाध्येप्रवीण पोटेगोपीचंद पडळकरचैतन्यबापू देशमुखप्रिया शिंदेसुजय विखेअर्चना पाटील चाकूरकर

सरचिटणीस

निरंजन डावखरेयोगेश सागरसंजय कुटेमाधवी नाईकराजेश पांडेसुनील राणे

चिटणीस

प्रशांत ठाकूर - कोकणमंगेश चव्हाण - उत्तर महाराष्ट्रपरिणय फुके - विदर्भवर्षा ढहाळे - पश्चिम महाराष्ट्रसंतोष जनाटे - कोकणसंजय जगताप - पश्चिम महाराष्ट्रअर्चना डेहनकर - विदर्भरोहिणी नायडू - उत्तर महाराष्ट्रराम सातपुते - पश्चिम महाराष्ट्रप्रवीण घुगे - मराठवाडारेखा कुलकर्णी - मराठवाडाभैरवी वाघ - उत्तर महाराष्ट्र

कोषाध्यक्ष 

मिहीर कोटेचा

सह कोषाध्यक्ष

अरुण लखानी

मुख्यालय प्रभारी

रवींद्र अनासपुरे

मुख्यालय सहप्रभारी

विश्वास पाठक

मुख्य प्रवक्ते

नवनाथ बन

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष

कृष्णराज महाडिक

महिला मोर्चा अध्यक्ष 

चित्रा वाघ

किसान मोर्चा अध्यक्ष

रामकृष्ण वेताळ 

ओ. बी.सी मोर्चा अध्यक्ष

योगेश टिळेकर

एस. सी मोर्चा अध्यक्ष

विश्वजित गायकवाड

एस.टी मोर्चा अध्यक्ष

देवराव होळी

भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष

नरेंद्र पवार

अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष

इद्रिस मुलतानी

दरम्यान, भाजपाच्या कार्यपद्धतीत ३ वर्षात पदाच्या जबाबदाऱ्या बदलत असतात. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने काम करत असतो. कार्यपद्धतीप्रमाणे नवीन चेहऱ्यांसोबत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Announces State Executive: New Responsibilities for Padalkar, Mahadik

Web Summary : BJP announced its Maharashtra state executive, giving new roles to Gopichand Padalkar and Krishnaraj Mahadik. Navnath Ban is now the chief spokesperson. The revamp balances experience with new faces, said Ravindra Chavan.
टॅग्स :BJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रGopichand Padalkarगोपीचंद पडळकर