शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

5 राज्यांतील निवडणुकीचे कल येताच भाजपचा आनंद गगनात; शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:49 IST

देशातील पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक आणि जोरदार टोला लगावला आहे....

देशातील उत्तर प्रदेशसह, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. एढेच नाही, तर कोणत्या राज्यात कुणाचे सरकार स्थापन होऊ शकते? हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, पंजाबमध्ये आप तर इतर चारही राज्यांत भाजपचे सरकार स्थापन होतांना दिसत आहे. यामुळे, केवळ या चारच राज्यांत नाही, तर महाराष्ट्रातही भजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. यानंतर आता, निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.

भाजपनं लगावला असा टोला -या पाचही राज्यांच्या निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेला खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजपने एक ट्विट करत, "शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा 'नोटा'सोबत असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते," असे म्हटले आहे. याच वेळी या ट्विटमध्ये भाजपने, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांची तुलना नोटासोबत केली आहे.

"नोटाला 1.1 टक्का लोकांनी मतदान केले, म्हणजेच नोटाला एकूण 6439 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 5058 मते मिळाली आहेत. शिवसेनेला 0.2 टक्के म्हणजेच 1099 मते मिळाली आहेत. तसेच, या दोन्ही पक्षांची मिळून 6157 मते आहेत," असे म्हणत, या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्पर्धा नोटासोबत होती, असे भाजपने दाखविले आहे. 

 याशिवाय, "या दोन्ही पक्षांचे नेते (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) 2024 मध्ये पंतप्रधान होतील, असा खोचक टोलाही भाजपने लगावला आहे."

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस