शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या विक्रीतून महाराष्ट्र मालामाल! मुद्रांक शुल्कातून राज्याची १८६ अब्ज रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:40 IST

‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक मालामाल झाले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नाेंदणीपाेटी मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राला १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. 

नवी दिल्ली : घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्यामुळे देशभरात मुद्रांक व नोंदणी शुल्कात ३५ टक्के वाढ झाली असून, महाराष्ट्रासह अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेश मालामाल झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशभरात मुद्रांक व नोंदणी शुल्कापोटी तब्बल ९४८.४७ अब्ज रुपयांची कमाई झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा ७०१.२० अब्ज रुपये एवढा होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्राची सर्वाधिक कमाई झाली आहे. राज्याला तब्बल १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला आहे.

‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक मालामाल झाले आहे. राज्याला मुद्रांक शुल्क व नाेंदणीपाेटी मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्राला १८६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. 

घट फक्त बिहारमध्ये बिहारच्या महसुलात ७३ टक्के घसरण झाली आहे. घसरण झालेले ते एकमेव राज्य ठरले आहे. बिहारचा महसूल २३ अब्ज रुपयांनी घसरून ६.२१ अब्ज रुपये झाला.

‘पुढील वर्षी बसू शकताे फटका’ - - ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे मुख्य अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्राने मागील १८ ते २४ महिन्यांत उत्तम कामगिरी केली आहे. 

- येणाऱ्या तिमाहीत या क्षेत्रास जागतिक मंदी, व्याजदर वाढ आदी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. 

४०% वाढ ११ राज्यांत - ११ राज्यांच्या महसुलात ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय आणि मिझोराम ही ती राज्ये होत. मिझोरामच्या महसुलात सर्वाधिक १०४% वाढ झाली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारHomeसुंदर गृहनियोजन