शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:03 IST

Lakhimpur Kheri Violence: 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही.'

कोल्हापूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारा(Lakhimpur Kheri Violence)विरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh)पुकारला आहे. या बंदवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्या दिवशी गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, असं पाटील म्हणाले.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही. लखीमपूर घटनेत जीप घुसली आणि चार जणांना चिरडलं गेले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या घटनेनंतर शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं. पण, त्या दिवशी जर गाडीमध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा असता, तर त्यालाही मारलं असतं,'अस पाटील म्हणाले.

महाराष्ट्र बंदची गरज काय ?पाटील पुढे म्हणाले, लखीमपूरच्या घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक झाली, त्याची चौकशी सुरू आहे. कायद्यानुसार या प्रकरणाचा काय निवाडा लागायचा तो लागेल. पण, यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती? व्यापाऱ्यांनी केवळ शिवसेनेच्या भीतीने दुकानं बंद ठेवली आहेत, यावरुन हा बंद सपशेल फसल्याचे सिद्ध झालंय. राज्यातील जनतेला हे नाटक कळतंय, भाजप या महाराष्ट्र बंदचा निषेध करतं, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra BandhMaharashtra Bandh