शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Bandh Live Updates: मराठा आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचार, परिस्थिती पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:05 IST

राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहतुकीचे तीन-तेरा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. 

Live Updates:

आज दिवसभरातील मराठा आंदोलनात काही ठिकाणी हिंसाचार घडून आला. तर अनेक जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी 7 नंतर परिस्थीती पूर्वपदावर आली आहे.

5.45 PM पुणे - खंडूजी बाबा चौकात आंदोलन सुरू, सुमारे दीड तासापासून रास्तारोको, आंदोलकांची रस्त्यावर बसकण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

5.40 PM - पुणे कलेक्टर ऑफिसजवळी आंदोलन मागे, 

5.30 PM - पुण्याच्या चांदणी चौकातील परिस्थीती नियंत्रणात, मुबंई पुणे एक्सप्रेस वेची वाहतूक सुरू

5.30 PM - बाहेरच्या लोकांनी हिंसा केली - कोंढरे

04:25 PM- चांदनी चौक परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार04:05 PM- चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक03.47 PM- पुण्यातील चांदणी चौक परिसरात आंदोलनाला हिंसक वळण03:17 PM- जळगावात राष्ट्रगीत गाऊन आंदोलनाची सांगता02:54 PM- नांदेडच्या उमरी रेल्वे स्थानकात तोडफोड02:40 PM- लोणीत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा02:30 PM- वाशिमच्या प्रत्येक बस थांब्यावर पोलीस तैनात02:18 PM- औरंगाबाद एमआयडीसीमध्ये पोलिसांची गाडी जाळली02:10 PM- बुलढाणा: मेहकर येथे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी मुंडन करून दिला आंदोलनाला पाठिंबा02:03 PM-  नाशिकमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; दुकानांवर दगडफेक01:55 PM- रिसोड येथील व्यापाऱ्यांनी पाळला शंभर टक्के बंद 01:46 pm- नाशिकमध्ये आंदोलनादरम्यान मोर्चेकऱ्यांची राजकीय नेत्यांना धक्काबुक्की01:39 PM- लातूर : माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख मराठा आंदोलनात सहभागी01:30 PM- परभणी : पूर्णा-औरंगाबाद मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवली01:23 PM- अहमदनगर : इंडियन सिमलेस कंपनीवर दगडफेक, कंपनी बंद न केल्याने अांदोलक संतापले01:15 PM- अमरावतीच्या तहसील कार्यालयासमोर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी01:08 PM- बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद12:54 PM- अहमदनगर: एमअायडीसीतील कामगारांचा बंद12:41 PM- अहमदनगरमधील जामखेड शहरात आंदोलन12:29 PM- जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न12:14 PM- भायखळा परिसरात कडकडीत बंद; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात11:57 AM- गाेवा हायवे बंद; महाडला वाहनांच्या रांगा11:49 AM- सोलापूरातील संभाजी चौकात मराठा क्रांती आंदोलकाकडून रक्ताभिषेक11:41 AM- यवतमाळच्या बस स्टँड चौकात मराठा मोर्चेकऱ्यांची घोषणाबाजी11:34 AM- कल्याण तहसील कार्यालयाबाहेर मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलनाला सुरुवात11:27 AM- चाकणमधील बहुतेक मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट सेवा बंद आहेत11: 19 AM- चिपळूण तालुक्यात कडकडीत बंद11:10 AM- शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर सकाळी 9 पासून मराठा समाजाचा ठिय्या11:11 AM- चाकणला कडकडीत बंद, महामार्गावर शुकशुकाट11:03 AM- नांदेडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद10:55 AM- अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आंदोलनात सहभागी10:47 AM- अहमदनगर शहरात पुणे- अहमदनगर महामार्गावर ठिय्या10:41 AM- लातूर : चाकूर शहर व तालुक्यात कडकडीत बंद10: 39 AM- रायगड - नागाेठणे बाजारपेठ 100 टक्के बंद10:35 AM- औरंगाबादमधील धूत हॉस्पिटल, सेव्हन हिल, पुंडलिक नगर येथे आंदोलकांचा रास्तारोको10:31 AM- परभणीतील सेलूमध्ये कडकडीत बंद;  क्रांती चौकात आंदोलक जमले10:28 AM- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट10:23 AM- आष्टी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयं, पेट्रोल पंप बंद10:20 AM- महाडमध्ये मुंबई-गाेवा महामार्गावर रास्ताराेकाे सुरु10:17 AM- रायगडच्या माणगावातील संपूर्ण बाजारपेठ बंद; एसटी बंद10:10 AM- मराठा माेर्चा आंदाेलक पाेलादपूरमधील मुंबई-गाेवा महामार्गावर; महामार्ग ठप्प10:04 AM- वर्धा : हिंगणघाट परिसरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प10:03 AM- रायगड जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त09:57 AM- अहमदनगर : नगर जिल्ह्यात कडकडीत बंद, बससेवा पूर्णपणे ठप्प09:51 AM- भंडारा : नागपूरला जाणारी एसटी बस सेवा बंद; जिल्ह्यातील ग्रामीण बस सेवा मात्र सुरळीत09:45 AM- नांदेड : बंदला उस्फूर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी रास्ता रोको09:38 AM- नाशिक- येवला तालुक्यातील पाटोदा येथे कडकडीत बंद09:31 AM- पनवेलमध्ये सर्वत्र शांतता; रिक्षा, बसेस व ट्रेन सुरू, पोलिसांचा मोठा बंदोबस्त09:24 AM- अलिबाग एसटी आगाराच्या बसेस बंद; प्रवाशांचे हाल09:16 AM- नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग सकाळी ७ पासून बंदच; मराठा समाजाचा रास्ता रोको09:08 AM- चाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत09:01 AM- जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे  मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन08:55 AM- जळगावात एसटी बस सेवा ठप्प; प्रवाशांचा खोळंबा08:51 AM- अहमदनगरमधील शेवगाव- गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे चौकाचौकात टायर पेटवले 08:47 AM- अहमदनगरमधील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प08:42 AM- अहमदनगरमधील राहुरीचा आठवडे बाजार बंद, बस स्थानकावर शुकशुकाट08:40 AM- दादरमधील भाजी आणि फूल मार्केट पूर्णपणे बंद08:21 AM- सोलापूरात बाभळीची झाडं आणि टायर पेटवून चक्का जाम, मोटारसायकल रॅली काढून आंदोलनाला सुरुवात08:07- नागपुरातील सर्व खासगी शाळांना सुट्टी जाहीर07:49: मुंबईतील बहुतांश शाळा आज बंद07:39 AM- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार07:27 AM- हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं बंद07:14 AM- ठाणे, नवी मुंबई, नाशिकमध्ये बंद नाही07:01 AM-  लातूर-बार्शी-पुणे महामार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी रस्ता रोखला07:00 AM- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद