शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Maharashtra Bandh: Lakhimpur Kheri Violenceविरोधात Mahavikas Aghadiचा आज राज्यव्यापी बंद, विविध कामगार संघटनांचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:09 IST

Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या (Lakhimpur Kheri Violence) निषेधार्थ उद्या, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी ( Mahavikas Aghadi) बंद पुकारला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या, सोमवारी महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारला आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बंद परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून कोणी व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप त्याला विरोध करेल, असे भाजपने म्हटले आहे. (Protesting the violence at Lakhimpur Kheri in Uttar Pradesh Mahavikas Aghadi Announced Maharashtra Bandh today)

नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केले आहे. त्याला आघाडीतील सर्व घटकपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. डावे पक्ष, संघटना, कामगार संघटना या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीनेही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

 मुंबई, पुण्यात व्यापाऱ्यांचा पाठिंबा; विदर्भात मात्र विरोध- दुपारी ३ पर्यंत दुकाने बंद ठेवणार असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले. तर मुंबईत शिवसेनेच्या विनंतीवरून व्यापारी ट्रेडर्स असोसिएशन चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवणार आहे.  - विदर्भातील व्यापाऱ्यांवर बंदसाठी सक्ती करू नये, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केले. 

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद-रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे.-उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील असणार नाही.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhMahavikas Aghadiमहाविकास आघाडीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार