शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Maharashtra Bandh : "ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 10:31 IST

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदवरून भाजपचा टोला. लखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद.

ठळक मुद्देलखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद.

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh) हाक देण्यात आली. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून टोला लगावला आहे.

"ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे. आज फक्त अधिकृतपणे करतायत एवढेच," असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.  शेलार यांचाही टोला "बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवलx त्या तथाकथित 'बंदसम्राटांचा' पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केलं, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी श्रमिकांना देशोधडीला लावलं," असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला. "एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच, हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा 'धंदा' गोळा होतो त्यावरच 'चंदा'!," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

सरकारचं हीन राजकारण - उपाध्ये"लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAtul Bhatkalkarअतुल भातखळकर