शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

"परभणी, बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक लावणाऱ्या’’, नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:58 IST

Maharashtra Assembly Winter Session: परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई - परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधानसभेत परभणी व बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला, त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. या घटनेवेळी पीआय महाजन व पाटील नावाचे पीएसआय त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलीस विभागात कार्यरत आहेत. वाल्मिक कराडच्या आदेशाने पोलीस विभागातील बदल्या होत आहेत का? बीडची घटना अत्यंत गंभीर असून त्याला राजकीय आशिर्वाद आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री यात सहभागी आहे अशी चर्चा आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर केले पाहिजे.

परभणीची घटना ही भीमा कोरगाव सारखीच आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले, दुकाने बंद झाली. पोलिसांनी घटना झाली त्यावेळीच योग्य ती कारवाई केली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, जनावरापेक्षाही वाईट पद्धतीने मारहाण केली. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? परभणीतील घटना सरकार प्रायोजित होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली व पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली पण सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केली नाही. बीडच्या घटनेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दोन दिवसात २०० खोटे गुन्हे दाखल केले आहेत, तोच शासन चालवतो. पोलीस काय करतात? पोलीस शासनाचे ऐकताच का गुंडाचे? मुख्यमंत्री सक्षम आहेत तरिही राज्यात अनागोंदी कारभार चालतो कसा? बीडमध्ये एका गुंडाची दहशत आहे, त्याचा ‘आका’ कोण? हे समजले पाहिजे. महाराष्ट्रात फोफावलेल्या या गुंडाराजचा आता अंत झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कायम राहिला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका, बिल्डर हिरानंदानी व पोलीसांच्या मदतीने तोडून टाकली. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात पोलीस, बीएमसी प्रशासन व बिल्डर हिरानंदानीला दोषी ठरवले आहे पण आजही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असेही नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार