शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 16:13 IST

Amit Raj Thackeray vs Eknath Shinde: शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे.

गेल्या काही दिवसांच्या वाक्युद्धानंतर माहीमचा लढा आता स्पष्ट झाला आहे. शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे. अमित ठाकरेंसाठी माघार न घेतल्याने सरवणकर व शिंदे सेनेविरोधात मनसैनिकांचा राग असणार आहे. हा राग फक्त माहीमच नाही तर मुंबईतील शिंदे गटाविरोधात असलेल्या १२ मतदारसंघांमध्ये निघण्याची शक्यता आहे. 

मनसेने एकनाथ शिंदेची शिवसेना जिथे जिथे उमेदवार लढवतेय त्यापैकी १२ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. शिंदे सेना मुंबईत १६ जागा लढवत आहे. यापैकी १२ जागांवर आता मनसैनिकांचा रोष पत्करावा लागणार आहे. उर्वरित ४ जागांवरही मनसे शिंदे सेनेला मदत करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून सस्पेन्स होता. आमदार सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती.

दरम्यान, आज सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे आता माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि काही कार्यकर्ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी गेले होते, यावेळी ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट दिली नाही.  दरम्यान, या भेटीवर बोलताना सदा सरवणकर म्हणाले,  आम्ही राज ठाकरे यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिली नाही. तुम्ही निवडणूक लढणार असाल तर लढा, असं राज ठाकरेंनी सांगितल्याचे सरवणकर म्हणाले. यामुळे आता मी निवडणूक लढणार आहे, असंही सदा सरवणकर म्हणाले.

माहीमच्या जागेवरील हा वाद आता १२ ते १६ मतदारसंघांत दिसणार आहे. हे मतदारसंघ कोणते आहेत. वरळी - मिलिंद देवरा (शिंदे गट) - संदीप देशपांडे (मनसे)माहीम- सदा सरवणकर (शिंदे गट) - अमित ठाकरे (मनसे)धारावी – राजेश खंदारे (शिंदे गट) – मनसेने उमेदवार दिला नाही.कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिंदे गट) - प्रदीप वाघमारे (मनसे).चांदिवली - दिलीप लांडे (शिंदे गट) - महेंद्र भानुशाली (मनसे).चेंबूर - तुकाराम काठे (शिंदे गट) - मोली थोरवे (मनसे)दिंडोशी - संजय निरुपम (शिवसेना) - भास्कर परब (मनसे)जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर (शिवसेना) – भालचंद्र अंबुरे (मनसे)भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिंदे गट) - शिरीष सावंत (मनसे).विक्रोळी- सुवर्णा करंजे (शिंदे गट)- विश्वजीत डोलम (मनसे).मानखुर्द शिवाजी नगर- सुरेश पाटील (शिवसेना)- जगदीश खांडेकर (मनसे).मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिवसेना)- नयन कदम (मनसे)

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेsada sarvankarसदा सरवणकरShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४