शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "युगेंद्र लहानाचा मोठा मुंबईत झाला, कुठलाही अनुभव ..." अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:45 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. ही लढत म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे. यामुळे राज्यातच नाहीतर देशात या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रचारसभा सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मविआ'ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज 'बोल भिडू' या युट्यूब चॅनेलने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार म्हणाले,युगेंद्र पवार यांचे सगळे लहानपण मुंबईत गेले आहे. ते कधी दिवाळी नाहीतर सुट्टीला कधी आली तर येत होती. यांना बारामती  किंवा हा परिसर आवडायचा नाही, कित्येकदा मीच माझ्या भावाला म्हणायचो की, यांना दिवाळी निमित्ताने तर येऊद्यात, सगळे एकत्र राहतील. तर ते म्हणायचे त्यांना इकडच वातावरण जास्त आवडत नाही त्यामुळे ते तिकडेच जास्त करुन राहत होते, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, एकदमच मध्ये लोकसभा निवडणूक आणि माझ्या भावाने शरयू फॅक्टरी  सुरू केली आहे. ती त्याला त्यांनी बघायला दिली आहे, बारामतीमध्ये शरयू टोयोटा आहे तीही तोच बघतो. यामुळे त्याचं इकडे येणे वाढल आहे. पण मी बारामतीमध्ये अनेक वर्षे काम केले. २४ वर्षाचा असताना एका कारखान्याचा संचालक झालो. तिथ बरीच वर्ष काम केल्यानंतर मी तालुक्यात काम सुरु केले. १९९१ ला मी पीडीसीसी बँकेचा संचालक झालो, त्यानंतर मी चेअरमन झालो. त्यानंतर १९९१ ला मला खासदारकीच तिकीट मिळालं. १९८४ पासून शेती बघत ही काम केली, पण युगेंद्रला कोणत्याही प्रकारच्या कामाचा अनुभव नाही. शरद पवार सांगतात उच्चविद्याभूषित आहे, असा टोलाही अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना लगावला. 

"माझं काम बारामतीकरांनी बघितलं आहे. अनेक लोकांनी बारामती कशी बदलत गेली हे बघितलं आहे, यामुळे माझा माझ्यावर विश्वास आहे, असंही अजित पवार म्हणाले. महायुतीचे सरकार कस सत्तेवर येईल या ध्येयाने आम्ही पुढे निघालो आहे, आम्ही आमच्या कामावर निवडणूक लढवत आहे, असंही पवार म्हणाले.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारbaramati-acबारामती