शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:16 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या १० उमेदवारांनी विरोधकांचा दारूण पराभव केल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० पर्यंत जे कल आहेत, त्यानुसार महायुतीचे २३२ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे ४२ उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ अपक्ष आघाडीवर आहेत.

Watch Live Blog >>

या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती केलेले कल, काही निकाल आणि बहुतांश राऊंडपर्यंत मतमोजणी लक्षात ठेवल्यास राज्यभरातील १० असे बडे नेते आहेत. जे जायंट किलर ठरले आहेत. यातील अनेक नेत्यांनी समोरच्या उमेदवाराला तब्बल ०१ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभूत केले आहे. राज्यातील टॉप १० मोठ्या फरकाने जिंकलेले नेते कोण आहेत? एक नजर टाकूया...

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’

१. सातारा मतदारसंघ - भाजपा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले - ०१ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजयी.

२. परळी मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे - ०१ लाख ३८ हजार २४१ मतांची विजयी आघाडी - २६ पैकी २३ राऊंडची मतमोजणी पूर्ण.

३. कोपरगाव मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे - ०१ लाख २४ हजार ६२४ मतांनी विजयी.

४.  कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ - शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे -  ०१ लाख २० हजार ३३५ मतांची विजयी आघाडी - २८ पैकी २७ राऊंडची मतमोजणी पूर्ण.

५. बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार - ०१ लाख ८९९ मतांनी विजयी.

६. कोथरुड मतदारसंघ - भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील - ०१ लाख १२ हजार ०४१ मतांची विजयी आघाडी - २१ पैकी २१ राऊंडची मतमोजणी पूर्ण. 

७. चिंचवड मतदारसंघ - भाजपा उमेदवार पांडूरंग जगताप - ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.

८. मावळ मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके - ०१ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी आघाडी - २९ पैकी २९ राऊंडची मतमोजणी पूर्ण.

९. मुंब्रा कळवा मतदारसंघ - शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड - ९६ हजार २२८ मतांनी विजयी.

१०. बोरिवली मतदारसंघ - भाजपा उमेदवार संजय उपाध्याय - ९५ हजार ०५४ मतांची विजयी आघाडी - २३ पैकी २२ राऊंडची मतमोजणी पूर्ण.

११. पुसद मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील नाईक - ९० हजार ७६९ मतांची विजयी आघाडी - २५ पैकी २५ राऊंडची मतमोजणी पूर्ण.

१२. उदगीर मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बनसोडे - ९३ हजार २१४ मतांनी विजयी.

दरम्यान, अनेक ठिकाणची अंतिम मतमोजणी अद्यापही बाकी आहे. अनेक ठिकाणी सगळ्या राऊंडची मतमोजणी पूर्ण झालेली असली, तरी निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या विजयी घोषित केले नाही. त्यामुळे सर्व ठिकाणची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम आकडा, मते समजू शकतील. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाVotingमतदान