शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

“न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे”; मनोज जरांगेंचे तुळजाभवानी देवीला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 20:24 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: सरकार कुणाचे आले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. सरकार स्थापन झाले की सामूहिक आमरण उपोषण करणार असून, ते मुंबईत होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे महायुती सत्ता स्थापनेची जय्यत तयारी करत आहे. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करताना पाहायला मिळत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत साकडे घातले, अशी माहिती मिळाली आहे. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, राजकारण हे आमचे क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असून, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर, काही केले तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. लढावे लागणार आहे. आमचा चळवळीवर विश्वास आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले, सरकार कुणाचे असले तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे

माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे,  लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे, आशीर्वाद मिळू दे, हेच मागणे तुळजाभवानी मातेकडे मागितले, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.

दरम्यान, आम्ही मैदानात नव्हतो. नाहीतर दणादण पाडले असते. समाज हाच मालक आहे, समाज कोणाच्या दावणीला बांधलेला नाही. मी समाजाचा मुलगा आहे. कोणाच्या दावणीला मी समाज बांधला नाही. समाजाचा वापर होऊ देणार नाही. मराठा समाजाशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही. एखाद्या आमदाने मराठ्यांना साथ नाही, एवढे फक्त बोलून दाखवावे, मग त्याला समाज कसा बाहेरचा रस्ता दाखवतो, हे पाहा, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलtuljapur-acतुळजापूरMaratha Reservationमराठा आरक्षण