शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:55 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. यावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, बारामतीचा मतदार माझा परिवार आहे. बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथे वेगळे जाहीरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणला. बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कॅन्सर हॉस्पिटलही उभारणार आहे, लॉजेस्टिक पार्क उभारणार आहे. शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार, असा शब्द अजित पवार यांनी दिला. 

मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला सांगितले की, ते निवडणूक लढणार आहेत, पण आता त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. मनोज जरांगे यांनी सांगत आहेत की, चांगल्या उमेदवाराला मत द्या. मग, आम्ही स्वत:ला चांगले समजतो, त्यामुळे मनोज जरांगे यांचा आम्हाला फायदा होईल, अशी मिश्कील टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे. मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्यासमोर कोणीतरी उभे राहणार आहे. मी लढू शकत नाही का? जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे, असे म्हणूनच लढत असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये १० हमी देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस