शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

“रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला, निवडणुकीचे काम देऊ नये”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:09 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती, अशी टीका काँग्रेसने केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत. यावर रश्मी शुक्ला यांना निवडणुकीसंदर्भात कामे देऊ नका, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल  धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकाना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशीर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती

रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, असे असतानाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांच्यामुळे निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे होतील याबदद्ल शंका असल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाठवले होते, त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शुक्ला यांना हटवण्याचे निवेदनही दिले होते त्यानंतरही शुक्ला यांना हटवले नाही. त्यानंतर ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. अखेर निवडणूक आयोगाने उशिराने का होईना रश्मी शुक्ला यांना हटवले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. माझ्या मते राज्य सरकारला थोबाडीत देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचा कार्यकाळ संशयित आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणे अनेकजण बोलतात. सत्तेचा गैरवापर त्यांच्या संबधित आहे. अशा व्यक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्यकाळात ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRashmi Shuklaरश्मी शुक्लाNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले