शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

दहा वर्षांतील सरकारच्या सत्तेत हिंदू खतरे में कसा, जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:40 IST

महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार असे कितीतरी प्रश्न असताना भाजपा कंटेंगे-बटेंगेची भाषा करीत आहे

इस्लामपूर : देशात व राज्यात १० वर्षांपासून तुमचे सरकार आहे, मग हिंदू खतरे में कसा आला? असा सवाल बोरगाव (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत जयंत पाटील यांनी केला.इस्लामपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बोरगाव येथे घेण्यात आली. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, नेताजीराव पाटील, सुश्मिता जाधव  उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, आपल्या आशीर्वादाने ३५ वर्षे आमदार आणि त्यातील साडेसतरा वर्षे राज्यात मंत्री म्हणून काम केले. मात्र इतक्या वर्षांत एकही काम तुम्हाला मान खाली घालावे लागेल, असे माझ्या हातून झालेले नाही. उलट तुम्हाला अभिमान वाटेल, तुमची मान ताठ होईल, असेच काम मी केले आहे.आज युवकांच्या हाताला काम हवे आहे. महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार असे कितीतरी प्रश्न असताना भाजपा कंटेंगे-बटेंगेची भाषा करीत आहे. शेती मालाचे दर वाढविले, तर महागाई वाढते, ही या सरकारची मानसिकता आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे.महाराष्ट्रातील मोठे उद्योग व अनेक कार्यालये गुजरातला पळविल्याने गुजरात राज्य दरडोई उत्पन्नामध्ये पुढे गेले आहे. हे राज्य पुन्हा जातीयवादी पक्षांच्या हातात देणार का, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या बहुजन हिताच्या विचारांच्या माणसांच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024