शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:56 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. याची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया होत असताना दुसरीकडे बिटकॉइन स्कॅमचा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरणे तसेच निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही काही ऑडिओ क्लिप शेअर करत आरोप केले. यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मीडियातून या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. यासंदर्भात योग्य चौकशी व्हायला हवी, असे माझे स्पष्ट मत आहे. या प्रकरणात नेमके काय खरे आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. कारण या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे

बिटकॉइन स्कॅमप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आवाज सुप्रिया सुळेंसारखा असल्याचे वाटत आहे. आपण म्हणू शकतो की आवाज सुप्रिया सुळेंचा आहे. पण निष्पक्षतेसाठी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊन जाऊद्या. जर कोणी आवाजात छेडछाड केली असेल, तर एआयच्या मदतीने त्याला उलगडा केला जाऊ शकतो. हे बिटकॉइन शेकडो कोटी रुपयांचे आहेत. हे प्रकरण निवडणुकीसंबंधीचे असल्याचे मानता येत नाही, हे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे प्रकरण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, ते माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी केलेले आहेत. काही क्लिप्स सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण खूप गंभीर आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे आरोप केल्यानंतर सत्य काय आहे, हे जगासमोर येणे गरजेचे आहे. याची चौकशी करून याचा अहवाल लोकांसमोर आला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BitcoinबिटकॉइनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवार