शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:17 IST

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राहुल नार्वेकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: एकनाश शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. यावेळी निरीक्षणे नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपाल यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात परतल्यावर ते याप्रकरणी कार्यवाही करतील, असे सांगितले जात आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.   

१६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल?

आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नमूद केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु त्याआधी इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांत आधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व नेमके कोण करते याचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने तसे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांत आधी यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला जाईल. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. 

दरम्यान, आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोण करत आहे. यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभा